शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी शिमोगा येथे भव्य मेळावा भरविण्यात आला होता. या प्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकेत यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हा तातडीने त्यांची सुटका करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
शेतकरी हे लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना केंद्र आणि राज्य सरकारने जाणूनबुजून शेतकरी नेत्यांना लक्ष्य बनविले आहे. टिकेत यांना नाहक अटक करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तातडीने जाचक ते तीन कायदे रद्द करावेत आणि शेतकऱयांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे.
देशद्रोही, दहशतवादी यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असताना शेतकऱयांना हे सरकार लक्ष्य बनवत आहे. ही बाब गंभीर आहे. तेंव्हा तातडीने संबंधितांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सिद्धगौडा मोदगी, एस. आर. पाटील, श्रीमंत नागराज यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









