मंत्री शंभूराज देसाईंचा केंद्र सरकारवर घणाघात
दौलतनगर : उसाला एफआरपी प्रमाणे योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र, त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे, याबाबत केंद्र सरकार का निर्णय घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे धोरण देशातील सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायचे धोरण आहे का ? असा सवाल राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी केला.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दूरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, जयराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.









