बेंगळूर/प्रतिनिधी
बुधवारी बेंगलुरसह अन्य भारतीय शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खाली आल्या. इंधन दराने सलग २४ दिवस विक्रमी उच्चांक गाठला होता. परंतु आज इंधन दरात काहीअंशी कपात झाली आहे.
बेंगळूरमध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत ९४.०४ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८६.२१ रुपये आहे. दरम्यान किंमती अनुक्रमे १८ पैसे आणि १५ पैशांनी खाली आल्या आहेत.
मुंबईत पेट्रोल ९७.४० रुपये प्रति लिटर रुपये आहे, तर डिझेलची किंमत ८८.४२ रुपये आहे, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दिल्लीत तेच पेट्रोलचा प्रति लिटर दर ९०.९९ रुपये आणि डिझेल८१.३० रुपये आहे.









