प्रतिनिधी / कोल्हापूर
तरुणीस त्रास दिल्याच्या गैरसमजातून गंगावेश येथे तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सोमवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गंगावेश येथील केएमटी बस स्टॉप येथे अभिषेक अशोक पाटील (वय 22 रा. सावर्डे दुमाला ता. करवीर) याच्यावर दोघांनी सत्तुरने हल्ला केला होता. या प्रकरणी ऋषीकेश संतोष कांबळे (वय 19), शांतीदुत सर्जेराव पोवार (वय 19 दोघेही रा. बालिंगा ता. करवीर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभिषेक पाटील मिरजकर तिकटी येथील एका लॅबमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करतो. सावर्डे येथून दररोज केएमटीने ये जा करतो. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो काम संपवून घरी जाण्यासाठी गंगावेश येथील केएमटी बस थांब्यावर थांबला होता. यावेळी मित्र विक्रांतही त्याच्या सोबत थांबला होता. विक्रांत फोनवर बोलत असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघाजणांनी अभिषेकवर सत्तुरने प्राणघातक हल्ला केला होता.
या प्रकरणी मंगळवारी दुपारी लक्ष्मीपुरी पोलीसांनी ऋषीकेश कांबळे, शांतीदुत पोवार या दोघांना मंगळवारी अटक केली. अभिषेकने एका तरुणीची छेड काढल्याच्या गैरसमजातून रविवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन तसेच मैत्रीणीची छेड काढल्याच्या कारणातून ऋषीकेश व शांतीदुत यांनी अभिषेकला सोमवारी सायंकाळी गंगावेश येथे लाथाबुक्यांनी मारहाण करत त्याच्यावर सत्तूरने वार केल्याची कबूली दिली. दरम्यान जखमी अभिषेक पाटील याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सिपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









