वृत्तसंस्था / मुंबई
लॉकडाऊनच्या संकेताचा प्रभाव -पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण राहिली आहे. मागील 15 दिवसाच्या कालावधीत सदरची घसरण ही जवळपास 10 टक्क्यांनी कमी राहिली आहे. घसरण होत राहिल्यास देशातील सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकतात, असे सांगितले जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार कच्चे तेल (क्रूड ऑईल) सध्याच्या कालावधीत 64 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे. ही स्थिती चालू महिन्याच्या प्रारंभी 71 डॉलर प्रति बॅरेल होते. कच्च्या तेलाच्या मागणीतील घट याला कारणीभूत ठरते आहे. युरोपीयन शहरांमध्ये कोरोनाचे वाढते आकडे तसेच प्रतिबंध आणि लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा सुरु होत असल्याने तेलाच्या मागणीवर परिणाम होताना दिसतो आहे.
तेल उत्पादक देशांनी एप्रिलपर्यंत तेल पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोना प्रतिबंध लस आल्याने जगभरात तेलाची मागणी वाढण्यासोबत किमती वाढण्यास मदत मिळाली होती. सोबत अमेरिकेने अर्थसहाय्य करण्याच्या घोषणेचीही मदत झाली होती. अभ्यासकांच्या माहितीनुसार जगभरातील काही शहरांमध्ये लॉकडाऊनची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे तेल मागणीत मोठी घट दिसली आहे. याचा थेट दबाव तेल किमतीवर राहणार असल्याचे संकेत आहेत.
27 फेबुवारीपासून किमती स्थिर देशामध्ये 27 फेब्रुवारीनंतर आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्याची माहिती आहे. यामध्ये पेट्रोलच्या किमतीच्या प्रभावामुळे विविध क्षेत्रांवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आहे.









