कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यात हत्तीसह अन्य वन्यजीवांचा वाढता वावर लक्षात घेऊन वन विभागाने चंदगड, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील 57 गावे संरक्षित वन क्षेत्रात समाविष्ट केली आहेत. याची अधिसुचना राज्याचे वन उपसचिव गजेंद्र नरवणे यांनी सोमवारी काढली. त्यामुळे जिल्ह्यात वन्यजीवांसाठी 400 चौरस किलोमीटर अधिवास क्षेत्र निश्चित झाले आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 14 आणि सातारा जिल्ह्यातील 17 गावेही संरक्षित क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत.
जिल्ह्यात हत्ती, गवे, बिबटÎांसह अन्य वन्यजीवांचा वावर वाढला आहे. प. घाटातील जैवविविधता आहे. दाजीपूर, राधानगरी अन् लागूनच चांदोली अभयारण्य आहे. जिल्हÎात आजरा तालुक्यात हत्ती कॅम्प प्रस्तावित आहे. गेल्या काही वर्षात हत्तीच्या वाढलेला वावर पाहता वन्यजीवाच्या संरक्षित क्षेत्राला मर्यादा येत होत्या. त्यातूनच प्रादेशिक वनक्षेत्र संरक्षित होण्यासाठी वन विभागाने पावले उचलली होती. सोमवारी जिल्हÎातील चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात 400 चौरस किलोमीटर संरक्षित क्षेत्राचा अध्यादेश निघाला आहे.
चंदगड तालुक्यातील 23 गावे संरक्षित क्षेत्रात समाविष्ट आहेत. तालुक्यातील 2 हजार 252.95 हेक्टरचा समावेश आहे. सर्वाधिक 225.4 चौरस किलोमीटर अधिवास क्षेत्र उपलब्ध झाले आहे. यामध्ये आडुरे, भोगोली, गुडवळे खालसा, ईसापूर, जांभरे, कोकरे, नागवे, नाव्हेली, पिळणी, उमगाव, वाघोत्रे, जलुगडे, कळसगादे, कलिवडे, किरवडे, कोदळी, कोलिक, म्हाळुंगे खालसा, पार्ले, हाजगोळी, जंगमहट्टी, माडवळे, गुळंबुचा समावेश आहे.
पन्हाळा तालुक्यातील 12 गावांतील 72.90 किलोमीटर क्षेत्र संरक्षित आहे. संरक्षित 7289.67 हेक्टरमध्ये काळजवडे, किसरूळ, मुगडेवाडी, पाटपन्हाळा, मानवाड, पिसात्री, कोलिक, पडसाळी, वाशी, पोहाळवाडी, पोंबरे, गोठणेचा समावेश आहे. दुर्मीळ प्राणी, वनस्पतींसाठी हे क्षेत्र आरक्षित केले आहे.
शाहूवाडी तालुक्यातील 22 गावांतील 9296. 37 हेक्टर क्षेत्र संरक्षित आहे. या 92.96 चौरस किलोमीटरमध्ये माण, धनगरवाडी, ऐनवाडी, चाळणवाडी, मानोली, वाळी कळकवणे, हुंबरळी, घोळसवडे, जावली, कासार्डे, अनुस्कुरा, बर्की, इंजोळी, मरळे, गजापूर, गेळवडे, शेंबवणे, विशाळगड, येळवण जुगाई, साबर्डी, गावडी, कुंभवडेचा समावेश आहे.
शेजारील सिंधुदुर्ग जिल्हÎातील सावंतवाडी, दोडामार्ग क्षेत्रातील 14 गावे संरक्षित झाली आहेत. येथील 5692.24 हेक्टरमधील 56.92 चौरस किलोमीटरचा समावेश आहे. दोडामार्ग, घोडगेवाडी, मोर्ले, नेरवण, मेढे, खडपडे, भेकुली, पारपोली, आंबोली, नेने, मासुरे, केगद, चौकुळ, कुंभवडे ही गावे आहेत.
सातारा जिल्हÎातील वाई तालुक्यातील 17 गावे संरक्षित क्षेत्रात आहेत. यामध्ये आसगाव, आकोशी, बलकवडी, भिवडी, गोळेगाव, गोळेवाडी, जांभळी, जोर, किरोंदे, कोंडावळे, कोठवली खुर्द आणि बुद्रुक, नांदवणे, परतवडी, उंळुंब, माशिवली, वासोळेचा समावेश आहे. येथे 65.11 चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित झाल्याची माहिती वन विभागातून देण्यात आली.