बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील आणखी ७२ जणांना कोविड -१९ विषाणूची लागण झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता ही संख्या ३७१ वर पोहोचली आहे. उडुपीमध्ये एकूण (११३) प्रकरणांपैकी ६३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधितांचा समावेश होता.
जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची चाचणी येत्या दोन दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कॅम्पसमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर उपायुक्त जी. जगदीश म्हणाले की जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल. एमआयटीला १७ मार्च रोजी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.