पुढील वर्षी होणार प्रदर्शित
एकता कपूरची निर्मिती असलेला आणि मोहित सूरीकडून दिग्दर्शित चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे चित्रिकरण सुरू झाले आहे. चित्रिकरणातील काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाली असून जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी दिसून येत आहेत. या चित्रपटात जॉन, अर्जुन कपूर, दिशा पाटनी, तारा सुतारिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मुंबईत चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. यापूर्वी जॉनने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे एक पोस्टर प्रसारित करत प्रदर्शनाची तारीख घोषित केली होती. तर दिशा पाटनीनेही एक छायाचित्र शेअर केले होते, ज्यात चित्रपटाचे नाव असलेल्या हुडीत पोझ देताना दिसून येत आहे.
हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या एक व्हिलनचा सीक्वेल आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुखने भूमिका साकारली होती. चित्रपटात रितेशने एका सायको किलरची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली होती.









