लॉकडाऊनची वर्षपुर्ती
कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
गतवर्षी 22 मार्चला जनता कर्फ्यु झाला, अन् 25 मार्चला देशभरात लॉकडाऊन सुरू झाले, जनता कर्फ्युला सोमवारी वर्ष पुर्ण होत आहे. तर गुरूवारी लॉकडाऊनला वर्ष पूर्ण होत आहे. 2020 संपत असताना कोरोना नियंत्रणात आला, प्रतिबंधक लसही आली. जिल्ह्यात जानेवारीत 34 सक्रीय रूग्ण होते, दोन महिन्यांनी ते आज 466 झाले आहेत. हा आकडा 500 वर गेल्यास जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोका आहे. लॉकडाऊन.. अनलॉक.. अन् आता दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.
गतवर्षी जगभरात आलेल्या कोरोना महामारीचा देशातही उद्रेक झाला, अन् 22 मार्चला देशभर जनता कर्फ्यु पुकारला गेला. त्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 25 मार्चला मध्यरात्रीपासून प्रत्यक्षात लॉकडाऊनला सुरूवात झाली. त्यानंतर लॉकडाऊन अनुभव जनतेने घेतला. निमर्नुष्य रस्ते, आवाहन करणारी पोलिसांची वाहने, रस्त्यावर दिसताच होणारी कारवाई.. त्यानंतर राज्याने 1 महिनाभर लॉकडाऊन वाढवले.. जनतेने तीन महिने लॉकडाऊनचा कटू अनुभव घेतला. कोरोनाची भीती, थांबलेले अर्थचक्र, उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि घराची ओढ त्यातून अनेकांची गावपांढरीचा रस्ता धरला, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीत काही जण गावी आले अन् कोरोंटाईन झाले, त्यांच्याच चोरटÎा पावलांतून कोरोना जिल्हÎात आला.
जुननंतर अॅनलॉक सुरू झाले, अन् कोरोनामुळे अडकून पडलेली मंडळी पुन्हा गावी परतू लागली, त्यातूनच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड झाला, बळींची संख्या वाढली, जिल्हा प्रशासनाच्या कठोर उपाययोजना आणि आरोग्य विभागाचे प्रयत्न, जनतेच्या सहकार्यातून कोरोना ऑक्टोबरमध्ये नियंत्रणात आला. वर्षअखेरीस कोरोनावर प्रतिबंधक लस आली, नववर्षांत जिल्हÎात कोरोना खतिबंधक लसीकरण सुरू झाले, कोरोना सक्रीय रूग्णांचा हजारांतील आकडा 34 वर आला, सारं काही पुर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाने डेके वर काढले. जिल्ह्यात दोन महिन्यात सक्रीय रूग्णसंख्या 466 झाली आहे. हा आकडा 500 वर गेल्यास कोरोनाची दुसरी लाट आव्हान ठरणार आहे.
वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन प्रारंभाला सोमवारी 22 रोजी 1 वर्ष पुर्ण होत आहे. लॉकडाऊनच्या आठवणी अंगावर काटा आणणाऱया आहेत, अनॅलॉकनंतरची गर्दी समोर येत आहे. आणि आता कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभुमीवर पुन्हा लॉकडाऊन होणार का, याची चर्चा आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे यात्रांचा हंगाम गेला, परीक्षा थांबल्या होत्या, आताही प्रशासनाच्या कठोर उपाययोजनांचे सावट यात्रांवर आले आहे. कोरोना नियंत्रण अन् लॉकडाऊन रोखण्यासाठी प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमावली काटेकोर अनुसरण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे.
जनता कर्फ्युची वर्षपुर्ती अन् जिल्ह्यातील कोरोना स्थिती
जिल्ह्यात दिवसभरात 81 नवे रूग्ण आले. त्यामुळे 20 मार्चपर्यत 51207 एकूण पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. 48985 जण कोरोनामुक्त आहेत. 466 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आजअखेर आजरा 902, भुदरगड 1249, चंदगड 1233, गडहिंग्लज 1539, गगनबावडा 155, हातकणंगले 5360, कागल 1694, करवीर 5810, पन्हाळा 1885, राधानगरी 1263, शाहूवाडी 1366, शिरोळ 2517, नगर पालिका क्षेत्र 7609, कोल्हापूर शहर क्षेत्र 16061 असे 48 हजार 643 आणि इतर 2564 असे 51207 रुग्ण आहेत. कोरोनाने 1756 जणांचा बळी घेतला आहे.