पंच कमिटीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले बेळगाव तालुक्मयातील गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा देवस्थानची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गावमर्यादीत करण्याचा निर्णय पंच कमिटीने घेतला आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 29 मार्च रोजी होणारी ही यात्रा आता गावमर्यादीत असून भक्तांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. सर्व भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला रवी पाटील, विष्णू पाटील, बाळू पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, जोंतिबा पाटील, ऍड. शाम पाटील, खेमाणी पाटील, परशराम पाटील, यल्लाप्पा पाटील, शिवाजी पाटील, महादेव पाटील यांच्यासह इतर पंच व ग्रामस्थ उपस्थित होते