नवी दिल्ली – वृत्तसंस्था
जागतिक पातळीवर आनंदी देशांची एक यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 149 देशांचा समावेश असून, त्यामध्ये भारताचा क्रमांक 139 वा लागला आहे. वार्षिक दरडोई उत्पन्न, आरोग्यदायी आयुष्याबाबतच्या अपेक्षा आणि स्थानिकांची मते या निकषांच्या आधारावर ही यादी तयार करण्यात आली. या यादीत भारत 139 व्या स्थानावर असतानाच पाकिस्तान मात्र 105 स्थानावर आहे. तर बांगलादेश आणि चीन अनुक्रमे 101 आणि 84 व्या स्थानावर आहेत. फिनलँड हा देश जगातील सर्वाधिक आनंदी देश म्हणून गणला गेला आहे.