दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज स्टार नितिन दोघेही स्वतःच्या केमिस्ट्राद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणार आहेत. दोघेही ‘रंग दे’ चित्रपटात एकत्र दिसून येतील. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
2 मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रंग दे हा एक रोमांटिक एंटरटेनर असून वेंकी अतलुरी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात साई कुमार, नरेश, कौशल्या, वेनेला किशोर आणि विनीत हे कलाकारही दिसून येतील.
कीर्ति सध्या महेशबाबू यांच्यासोबत सरकारू वारी पाटा चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. याचबरोबत अन्नाथे या तमिळ चित्रपटातही ती दिसून येणार आहे. शिवा यांनी याचे दिग्दर्शन केले असून कलानिधी मारन याचे निर्माते आहेत. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत, मीना, खुशबू, कीर्ति सुरेश, नयनतारा, प्रकाश राज यासारखे अनेक दिग्गज दिसून येतील. याचबरोबर कीर्ति मोहनलाल यांच्यासोबत एक चित्रपट करत आहे.









