बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी एक महत्वपूर्ण आवाहन नागरिकांना केलं आहे. मंत्री सुधाकर यांनी शुक्रवारी सुरू कोरोना परिस्थितीचा उल्लेख करून नागरिकांना, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवकांना रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी नागरिकांनी शक्य तितक्या लवकरात रक्तदान करण्याचे आवाहनही केलं.
“मंत्री सुधाकर यांनी कोविड -१९ च्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याआधी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या काळात आम्हाला जास्त रक्त लागण्याची गरज भासू शकते. अशा वेळी सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनी रक्तदान वाढविण्यासाठी सरकारशी हातमिळवणी केली पाहिजे. तेच रक्तदान शिबिरे घेण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे ते म्हणाले.