ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात दिल्लीत 607 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 45 हजार 632 वर पोहचली आहे. यामधील 2,924 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 384 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 31 हजार 759 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,949 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 35 लाख 89 हजार 523 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 48,737 आरटीपीसीआर टेस्ट आणि 31,516 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.75 % आहे. तर 647 झोन आणि 244 कंट्रोल रूम आहेत.