बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मंत्री रमेश जरकिहोळी यांच्या कथित सीडीमध्ये दिसणाऱ्या महिलेच्या वडिलांनी बेळगावच्या एपीएमसी यार्ड पोलीस ठाण्यात २ मार्चपासून मुलगी बेपत्ता असल्याची तकार तिच्या वडिलांनी दिली आहे. वडिलांनी मुलगी हरवण्याबरोबरच तिचे अपहरण केल्याची शंका उपस्थित केली. दम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
दरम्यान महिलेच्या वडिलांनी सांगितले की २ मार्चपासून कुटुंब तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. आजच्या दिवशी टीव्ही वाहिन्यांनी व्हिडिओ क्लिप दाखविली. त्याने दावा केला आहे की त्याची मुलगी बेंगळूर येथे पीजी निवासस्थानापासून दूर हलविण्यात आले होते आणि तिला गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले होते.
एसआयटीच्या तपासणीत सीडी तयार करण्यात सात जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तुमकूर ल्ह्यातील नरेश गौडा, देवनाहळ्ळी तहसीलचे श्रावण, चिकमंगळूर जिल्ह्यातील भवित, आकाश तळवाड, लक्ष्मीपती, अभिषेक यांच्यासह सात जणांचा समावेश आहे. भवित यांनी पटकथा तयार केली होती. आकाश तळवडे या युवतीचा मित्र असून असून त्याने सीडी तयार करण्यास सहकार्य केले आहे.
लक्ष्मीपती याने सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहळ्ळी यांच्याकडे सीडी दिली. नरेश एक टीव्ही पत्रकार आहे. भवित, अभिषेक आणि लक्ष्मीपतीही पत्रकार आहेत. पोलिसांना हेही कळले आहे की लक्ष्मीपतीने दिनेशला सीडी देण्यासाठी काही पैसे दिले होते. म्हणूनच एसआयटी लक्ष्मीपतीची चौकशी केली आहे.