प्रतिनिधी / नांद्रे
नांद्रे ता. मिरज येथील रेल्वे स्टेशनच्या फाटकापासून काही अंतरावर एका अज्ञाताचा रेल्वेखाली चिरडून मुत्यू झाल्याची घटना सकाळी घडली.
बुधवार दि. १७ मार्च रोजी सकाळी गांधीधाम- बेंगलोर गाडी क्र. ०६५०५ हि एक्सप्रेस रेल्वे अजमेरकडून मिरजेकडे जात आसताना हा आपघात झाला आहे. या मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.








