बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात परवानगी नसताना खासगी शाळा १ ली ते ५ वीचे ऑफलाईन वर्ग घेत आहेत. दरम्यान ही बाब शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास येताच इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांसाठी ऑफलाइन वर्ग घेणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी शिक्षण विभागातील १ ली ते ५ वी वर्गातील मुलांसाठी ऑफलाइन वर्ग घेणाऱ्या राज्यांतील शाळांवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
“कोरोना तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने फक्त ६ व त्यापेक्षा जास्त वर्गातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्ग घेण्यास शाळांना परवानगी दिली होती. “राज्यभरातील अनेक शाळांमध्ये ६ वर्षांखालील वर्गांसाठी ऑफलाइन वर्ग घेण्यात येत असल्याचे माध्यमांतून कळविण्यात आले आहे,” सुरेश कुमार म्हणाले.