आयटकचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी नोकरदारांप्रमाणेच केएसआरटीसी कर्मचाऱयांनाही वेतन द्यावे, सहावा वेतन आयोग लागू करताना सरकारी कर्मचाऱयांप्रमाणेच लागू करावा, बसकडून टोल आकारू नये, डिझेल कमी किमतीत द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी केएसआरटीसी स्टाफ आणि वर्कर्स युनियन (आयटक) यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
डिझेलचे दर वाढत असल्यामुळे केएसआरटीसीला परवडणारे नाही. सरकारी विभाग असल्यामुळे डिझेलमध्ये सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पासचे पैसे सरकारकडे अनेक वर्षांपासून बाकी आहेत. 2 हजार 900 कोटी रुपये सरकारकडे आहेत, ते द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
केएसआरटीसीच्या एका विभागाकडून दरवषी 65 कोटी रुपयांचा टॅक्स वसूल केला जातो. त्यातही सूट दिल्यास परिवहन मंडळ मजबूत होईल. तेव्हा त्यामध्येही सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष नागेश सातेरी, सी. एस. बिदनाळ, एस. एन. बेन्नी, बी. व्ही. नरसण्णावर, व्ही. व्ही. चिकमठ, एस. व्ही. माने, एस. बी. उप्पार, एस. व्ही. यरडी, एस. बी. बिर्जे व कर्मचारी उपस्थित होते.









