ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पुदुचेरीतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस निवडणूक समितीची आज सकाळी बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या एका नेत्याने द्रमुकचा झेंडा फडकवल्याने सभागृहात खळबळ उडाली. या बैठकीला पुदुचेरीचे माजी मुख्यमंत्री नारायणसामीही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच नेत्यांमध्ये झटापट झाली.
या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर काँग्रेस कार्यालयाबाहेर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.









