बेंगळूर/प्रतिनिधी
जदएस चे माजी आमदार मधु बंगारप्पा यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केली. त्यांनी आपल्याला नव्या पक्षात काम करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी आहे. मधु यांनी गुरुवारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेत आपण कॉंग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले.
मधु यांनी आमच्या सर्व समर्थकांनी हा निर्णय घेतला होता. म्हणूनच मी आज कॉंग्रेसमध्ये सामील होत आहे, असे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. बंगारप्पा यांचे पुत्र मधु बंगारप्पा यांनी पत्रकारांना सांगितले.
गेल्या एका वर्षापासून, काँग्रेसमध्ये जाण्याची त्यांनी इच्छा होती. आज शेवटी ती पूर्ण झाली. सिद्धरामय्या यांची भेट घेतल्यानंतर मधु यांनी देश आणि राज्यासाठी कॉंग्रेस पक्षाची गरज आहे, असे म्हण्टले. ते कॉंग्रेसमध्ये अधिक चांगले काम करू शकतात असे सांगून ते म्हणाले की, त्यांचे वडील कॉंग्रेसमध्ये असताना राज्याचे मुख्यमंत्री झाले. पक्षातील नेते त्यांना बोलवत असल्याने त्यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले.









