नंदिग्राम / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी नंदिग्राममध्ये रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
विधानसभा निवडणुकीत ममता यांचा सामना त्यांचे निकटवर्तीय राहिलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. ममताच्ंया शक्तिप्रदर्शनानंतर बोलताना नंदिग्राममध्ये तृणमूलचा 200 टक्के पराभव होणार असून 100 टक्के भाजपचा विजय होईल, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे. सुवेंदू यांनी तृणमूल काँग्रेसचा हात सोडत काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. अधिकारी शुक्रवारी, 12 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी ते नंदिग्राममधील आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनही ते करणार आहेत.









