प्रतिनिधी / करमाळा
सोलापुर या जिल्ह्यातील करमाळा हे एक छोटंसं गाव, त्या गावात रोजंदारी करुन उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबात जन्मास आलेलं कन्यारत्न म्हणजे पुजाताई झोळे. सध्या तिचं नावं तिन आपल्या कर्तृत्वाने अन् वत्कृत्वाने राज्यभर गाजवल ती महाराष्ट्र कन्या म्हणजे पुजा झोळे होय. घरात अठरा विश्व दारीद्र्य असणाऱ्या कुटुंबातील हि पोरं, अभ्यासात चुणचुणीत असल्याने आपल्या लेकीने खुप शिकावं अन् शिकुन खुप मोठं व्हावं हि आई-वडिलांची इच्छा होती.
त्यासाठी त्यांनी मोलमजुरी करुन वेळप्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेऊन तिला शहरात शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. पोरीने पण आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आईबापाच्या कष्टाची जाण ठेवुन,आई-बापालाही आपल्या लेकीचा अभिमान वाटावा असा तिने शिक्षणात ठसा उमटवला.पुण्यातील मॉडर्न कॉलेज या नामांकित कॉलेजमध्ये तिने इंजिनिअरिंग आय टी मध्ये प्रथम रँक मिळवला. इंजिनिअरींग सुरु असताना कित्येक प्रलोभने, विलोभने समोर आली, असंख्य अडचणी आल्या,कॉलेजची झगमग दुनिया बघितली पण आईबापाच कष्ट डोळ्यासमोर ठेवुन तिने अडचणीवर मात करुन अव्वल रॅंक मिळवला.ज्यावेळी इतर मुली मस्त झोपलेल्या असायच्या अशा वेळी हिचा अभ्यास सुरु असायचा.
इंजिनिअरिंग पुर्ण झाली पण तिच्या बुद्धीची भुक इथच थांबली नाही तर तिने पुढे एलएलबी मध्ये प्रवेश घेतला.तसेच अभ्यासा बरोबर तिने स्वतःची चुणुक दाखवत कॉलेमध्ये शिकत असतानाच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केली,उपोषण केले आणि एवढ्या वरचं न थांबता राजकारणात पाऊल ठेवत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आवाज घुमवला.कोण कुठली खेड्यातील एका गरीब कुटुंबातील पोरं पुण्यात येते आणि तिथं आपला दबदबा आपल्या कर्तृत्वावर निर्माण करते ति दुसरी तिसरी कोणी नसुन पुजा झोळे.
पुजाला सुरीवातीस “खेड्यातील एढ” म्हणणारे आज तिच्या मागेपुढे मिरवतात. पुजाकडे ना कुठला राजकीय वारसा आहे, ना तिच्याकडे तिच्या बापजाद्याची ऐशोआरामात जगण्याइतपत संपत्ती आहे.तरीही तिची समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हि तिची अविरत धडपड सदैव सुरुच असते. गल्ली पासुन ते दिल्ली पर्यंत निघालेल्या दिल्ली मधील किसान आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन तिने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आवाज उठवला. खरच प्रत्येक घरात अशी लेक जन्माला आल्यास केवळ घर आणि गावच पुढे जाणार नाही तर देशसुद्धा पुढे जाईल. पुजाताईने आपल्या आईबापाला अभिमान वाटेल असाच नावलौकिक मिळविला आहे. सांगली कोल्हापुर मधील पुराच्या वेळी लोकांच्या अडचणीत समर्थपणे उभा राहुन त्यांना आधार दिला विशेष म्हणजे बेघर लहानग्यांना सुद्धा सदैव मदतीचा हात देणारी हळव्या मनाची पुजाताई.तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चात पहिल्या आंदोलनापासून ते शेवटी आरक्षणाची मागणी मान्य होत नाही,तोपर्यंत तिने आपल्या भाषणांनी मराठ्यांच्या रक्तात आरक्षणाची मशाल पेटवली व त्यात स्वतः उडी घेतली.काळजाचा ठोका चुकवला ती हिच पोरं रणरागिणी पुजाताई झोळे.
सरकार मागण्या मान्य करे पर्यंतच नाही तर त्या मागण्या मंजुर करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा करण्यात खारीचा वाटा उचलणारी हि कणखर पोर आहे.गड किल्ले संवर्धनातही सदैव अग्रेसर असते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातहि निर्भिड रोखठोक असा नावलौकिक तिने मिळवला आहे.तसेच मराठा विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी काम करणारी सारथी संस्था वाचवण्यासाठी तिने उभारलेला लढा आणि त्या लढ्या दरम्यान आपल्या परक्यांनी केलेलं ट्रोल हे वेदनादायी होतं.
तरीही या वाघिणीने अवघ्या महाराष्ट्रातील युवा वर्गाची ट्युब पेटवुन सारथी आपल्यासाठी कशी महत्त्वपुर्ण आहे हे सांगुन तो लढा यशस्वी करण्यात खुप मोठा वाटा उचलला.सारथी संस्था वाचवण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांसोबत आपले आदरणीय छत्रपती संभाजी राजेंनी मागणीचा जोर लावुन धरत उपमुख्यमंत्री अजितदादा व मंत्री एकनाथ दादा शिंदे यांनीही सारथीला न्याय दिला अन् निधी सुद्धा दिला.हा विजय समस्थ मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांच्या हितासाठी खुपच महत्त्वपुर्ण होता
आणि या सारथीची इतर मराठा बांधवाप्रमाणे एक शिलेदार पुजाताई आहे. आजवरच तिचा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष पाहता तिला राज्यातील राष्ट्रवादी सारख्या प्रमुख पक्षात खा.सुप्रिताई सुळेंनी तिला “राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश सरचिटणीस” हे पद देऊन तिच्या कर्तृत्वाचा गौरव करुन पाठीवर थाप देतं तिला मानाचं स्थान दिलं गेलं.पद दिलं म्हणुन गप्प न बसता पदास साजेस काम ती आजही करतेय,जिथे जिथे विद्यार्थांचा,शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्या प्रश्नांसाठी ती पाठपुरावा करते.तिची तळमळ आणि कुठलीही तडजोड न करता तिचा प्रामाणिकपणे सुरु असलेला संघर्ष नक्कीच उद्याचा तिचा उज्ज्वल भविष्याकाळ आहे.
नक्कीच येणाऱ्या काळात कु.पुजा झोळे या रणरागिणीच्या रुपाने महाराष्ट्राला एक कणखर सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्व लाभणार आहे.कु.पुजा झोळे हि केवळ मोठ-मोठे बडाया मारत नाही तर कुठलंही कार्य तडीस नेणारी खरी मर्दानी आहे.अंगी कणखर बाणा बाळगणारी हि महाराष्ट्राची लेक समाजातील प्रत्येक घटकांसाठी आणि समाजासेवेसाठी सदैव तत्पर असते आणि हिच खरी उंची आहे तिच्या कार्याची. तिची समाजाप्रती आणि समाजकार्यासाठी असलेली तळमळ शब्दांत जोखण अवघडच आहे. आजच्या जागतिक नारीशक्ती दिनानिमित्त तिच्यातील नारीशक्तीस सलाम व्यक्त केले.