नवी दिल्ली
दमदार मजबूत मोटारसायकलींसाठी प्रसिद्ध असणाऱया रॉयल इनफिल्ड कंपनीच्या भारतातील दुचाकी विक्रीमध्ये फेब्रुवारीत 6 टक्के इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे. आरामदायी, दमदार दुचाकींना युवा वर्गाची अधिक मागणी राहीली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीने 65 हजार 114 मोटारसायकलींची विक्री केली आहे. दरम्यान कंपनीने फेब्रुवारी 2020 मध्ये 61 हजार 188 दुचाकींची विक्री केली होती. कंपनीची एकूण दुचाकी विक्री 10 टक्के इतकी वधारलेली दिसली. फेब्रुवारीमध्ये इनफिल्डने एकूण 69 हजार 659 दुचाकींची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीने निर्यातीच्या बाबतीतही चांगली कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने मागच्या महिन्यामध्ये 4 हजार 545 दुचाकींची निर्यात करताना 2020 मध्ये समान कालावधीत कंपनीने 2348 दुचाकींची निर्यात केली होती.









