लंडन
सध्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱया जहाजाचा फोटो मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. सदरच्या फोटोमध्ये जवळपास 3 लाख टन वजनाचे जहाज हवेमध्ये उडत असल्याचे दिसत आहे. यामुळे लोकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आल्याचे पहावयास मिळाले आहे. या फोटोमध्ये जवळपास कोणीही नसल्याचे दिसून येत असून, तरीही पाण्यावरती जहाज उडताना का दिसत आहे, ही बाब मात्र अनुत्तरीतच राहिली आहे. साधारणपणे हे एक दुर्लभ ऑप्टिकल इल्यूशन(भ्रम) असल्याच्या कारणामुळे असे होत असल्याचे सदरच्या व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण देताना अभ्यासकांनी म्हटले आहे. कारण हा फोटो ब्रिटनच्या डेव्हीड मॉरिस यांनी कॉर्नवालच्या फालमाउथ जवळ कॅमेऱयामध्ये हे जहाज बंदीस्त केले होते. बीबीसीचे हवामान अभ्यासक डेव्हिड ब्रायन यांनी म्हटले आहे, की सुपीरियर मिराज दुर्लभ वायुमंडळातील परिस्थितीमुळे ही स्थिती निर्माण होते.









