प्रतिनिधी / नागठाणे
आसनगाव (ता.सातारा) येथील चोरट्या दारु अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सुमारे ३,१९८ रुपये किंमतीची दारू जप्त केली. याप्रकरणी किसन ज्ञानू गायकवाड (वय.५५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसनगाव येथे चोरून दारूविक्री होत असल्याची माहिती सपोनि डॉ. सागर वाघ याना मिळाली.त्या अनुषंगाने सहायक फौजदार वसंत जाधव, हवालदार विजय साळुंखे व राहुल भोये यांनी तेथे कारवाई केली. यावेळी राहत्या घराच्या आडोश्याला किसन गायकवाड हा चोरून दारूविक्री करताना आढळून आला.त्याच्याजवळून पोलिसांनी ३१९८ रुपये किमतीच्या १२३ देशी दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सहाय्यक फौजदार वसंत जाधव करत आहेत









