संजय खूश / इचलकरंजी
यंत्रमागधारकांना वीज बिलात सवलत मिळावी म्हणून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले होते. मात्र राज्यातील ९५ टक्के यंत्रमागधारकांनी हे अर्ज सादर केलेच नाही. त्यामुळे अर्ज सादर न केलेल्या यंत्रमागधारकांना वीज बिलाची सवलत रद्द होऊन आल्यास इचलकरंजी शहरात तब्बल दहा कोटी रुपयांची वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या कारणामुळे शहरात यंत्रमागधारकांच्या पुन्हा असंतोष निर्माण होण्याचा धोका आहे. याबाबत शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास थकबाकी सारखा वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरलेला विषय यंत्रमाग धारकांच्या माथी येणार आहे.
राज्यात सुमारे दहा लाख पेक्षा अधिक यंत्रमाग आहेत. यामध्ये साध्या यंत्रमाग बरोबरच अत्याधुनिक यंत्रमागाचा समावेश आहे. देशात शेती पाठोपाठ सर्वााधिक रोजगाराभिमुख उद्योग म्हणून यंत्रमाग व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे या व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगासाठी वीज बीलात सवलत आहे. साधे यंत्रमागासाठी वीजेचा दर साडे सहा रुपये आहे. तो सवलतीमुळे साडेतीन रुपये इतका पडतो. हा दर २७ अश्वशक्तीच्याआतील वीज वापरण्रया उद्योजकांसाठी आहे. तर २७ अश्वशक्तीच्यावरील उद्योगासाठी हा दर सात रुपये असून सवलतीचा दर साडेचार रुपये इतका आहे. यामुळे राज्यात उत्पाादित होणाऱ्या कापडाचा उत्पादन खर्च कमी होतो. ही सवलत इतर राज्यात असल्यामुUे कापड दराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी राज्यात वीज दरात सवलत आवश्यक आहे.
सवलतीसाठी ऑनलाईन अर्ज
वीज बिलात अनुदान घेण्रया राज्यातील सर्व यंत्रमाग धारकांची माहिती एकत्रित व्हावी यासाठी शासनाने सर्व यंत्रमागधारकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा आदेश काढला. राज्याचे वस्त्रोद्योग खात्याचे अवर सा†चव ा†वशाल मदने यांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी काढलेल्या या देशात २७ अश्वशक्तीच्याखालील व त्यावरील वीज कनेक्शन असलेल्यांना अर्ज करणे बंधनकारक होते.
याची मुदत २८ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात आली होती. ऑनलाइन अर्ज सादर करण्यात अनेक अडचणी आल्या नंतर यंत्रमाग धारक संघटनांनी याबाबत शासनाकडे तक्रार केली. त्यानंतर संबंा†धत यंत्रमागधारकांना आŸफलाईन अर्ज अर्जासाठीही परवानगी देण्यात आली.
अनेकांनी फिरवली पाठ
ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करताना यामध्ये अनेक बाबी किचकट होत्या. तसेच काही अटी या अनेक यंत्रमागधारकांना वीज बिलाची सवलत मिळवण्यासाठी जाचक ही ठरताहेत. याबाबत यंत्रमागधारक संघटनानी हा आदेश रद्द करून सरसकट सर्वच यंत्रमागधारकांना वीज ा†बलाची सवलत या पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याची मागणी केली. परंतु ही मागणी मान्य करण्यात आली नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची अट रद्द होईल असे अनेकांना वाटले पा†रणामी केवU पाच ते दहा टक्केच यंत्रमागधारक ऑनलाइन अर्ज सादर केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
तर वाढीव बिले
शासन आदेशाप्रमाणे विद्युत वितरण कंपनीकडून ज्यांनी अर्ज सादर केले आहेत त्यांना सवलतीच्या दरात वीज बिले देण्यास सुरुवात केली तर इचलकरंजी शहरातील तब्बल दहा हजार यंत्रमागधारकांना वाढीव ा†बले येण्याची शक्यता आहे. परिणामी हे बील जवपास दुपट होणार आहे. शहरातील एकूण यंत्रमाग संख्या आाणी त्याची बीले पाता पुन्हा शहरातील यंत्रमाग धारकांच्या वर तब्बल दहा कोटी रुपयांचा आ†ता†र‹ बोजा पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
आश्वासन पण आदेश नाही
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जाचक अटी बाबत येथील यंत्रमाग धारक संघटना यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी ा†वा†वध मंत्र्यांची भेट घेतली आहे. या प्र†ता†नधींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दोन महिन्याची मुदत वाढ देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ऑनलाईन ची वेबसाईट बंद झाली आहे. ऑफलाइन अर्जासाठी फ‹ सत्तावीस अश्वश‹ीच्या आतील वापरकर्त्यांना सवलत देण्यात आली. मात्र २७ अश्वश‹ीच्या वरीलउद्योजकांना ऑफलाइन ची सुद्धा सुरू झालीच नाही.
पुन्हा पोकळ थकबाकी
ऑनलाइन अर्ज सादर न केलेल्या उद्योजकांना वाढीव बिले आली तर याबाबत तीव्र असंतोष निर्माण होणार आहे.त्यामुळे शासन स्तरावर सवलतीच्या दरात वीज बीले भरून घ्या असा आदेश निघाला तर वाढीव बील उद्योजकांच्या खात्यावर तशीच राहणार आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या प्रकाराप्रमाणे यंत्रमाग धारकांच्या प्रत्येक ा†बलात पोकU थकबाकीची समस्या निर्माण होणार आहे. विनय महाजन , अध्यक्ष यंत्रमागधारक जागृती संघटनाठ
आदेश रद्द करावा
ऑनलाइन अर्जामुळे यापूर्वीच यंत्रमागधारकांना पाच टक्के व्याज सबा†सडीचा लाभ योग्यरीत्या घेता आला नाही. आता पुन्हा वीज बिलातही तशीच समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने हा आदेश रद्द करून यापूर्वी सरसकट सर्वच यंत्रमाग उद्योजकांना वीज बिलात सवलत कायम ठेवावी. सतीश कोष्टी, अध्यक्ष इचलकरंजी पावरलूम असोसिएशन.
दृष्टिक्षेपात यंत्रमाग वीज दर
इचलकरंजीतील एकूण यंत्रमाग :१ लाख २५ हजार
साधे यंत्रमागाचे वीज बील: तीन रुपये ५० पैसे प्रती युनिट
आधुा†नक यंत्र मागाचे वीजा बील :चार रुपये ५० पैसे प्रती युनिट
सवलत नमिळाल्यास प्रती युनिट तीन रुपयांची दरवाढ
शहरातील यंत्रमाग उद्योजकांना प्रती महा दहा कोटीचे रुपयाचे वाढीव वीज बील
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









