हिडकल जलाशयातील व्हॉल्व नादुरुस्त
प्रतिनिधी / बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल जलाशयातील व्हॉल्व नादुरुस्त झाले आहे. सदर व्हॉल्वची दुरुस्ती दि. 4 ते 7 मार्चदरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे 4 दिवसांच्या कालावधीत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उत्तर भागासह 24 तास पाणीपुरवठा योजनेतील परिसरात पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे.
व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. दुरुस्तीकरिता चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होणार आहे. या चार दिवसांत विविध भागांचा पाणीपुरवठा ठप्प होणार असून, राकसकोप जलाशयातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केले
आहे.