प्रतिनिधी / सातारा
सातारा एस टी स्टँड येथे आज दुपारी तीनच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी रडत बसली होती, त्यावेळी ड्युटी कॉन्स्टेबल पो ह दत्ता पवार,पो कॉ विलास गेडाम,पो कॉ अजयराज देशमुख हे परिसराची पेट्रोलिंग पाहणी करत असता तिला स्टँड वरील चौकीत आणून चौकशी केली.
यावेळी ही मुलगी काटे बिल्डिंग, काटेनगर ,पिंपळे सौदागर पुणे (हद्द सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड )या ठिकाणची रहिवाशी असून शिवाजी चौक रहाटनी येथून अज्ञात इसमाने जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसून रात्री 3 वाजता हाय वे वर सातारा नजीक गाडीतून सोडण्यात आले,त्या ठिकाणाहून एका दुचाकी स्वराला मदत मागून सातारा एस टी स्टँड येथे आल्याची हकीकत या मुलीने सांगिल्यावर तात्काळ याबाबत सातारा शहर पोलीस स्टेशन येथे संबंधित मुलीबद्दल माहिती देऊन सांगवी,पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधला असता सदर मुलगी नामे पायल सुखदेव रोकडे वय 17 वर्षे 3 महिने काल सकाळ9 पासूनबेपत्ता असल्याबाबत पोलीस स्टेशन मध्ये भा द 363 अन्वये फिर्याद दाखल असून तिचा शोध सुरू आहे.
या बाबत वरिष्ठांशी चर्चा करून सदर अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्याचे ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळी 7 चा सुमारास अल्पवयीन मुलगी नामे पायल सुखदेव रोकडे हिला तिचा आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाई मध्ये सातारा शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचा मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार दत्ता पवार,पोलीस कॉ विलास गेडाम,पो कॉ अजयराज देशमुख यांनी कारवाई पार पाडली.