दिघंची मधील रोहित स्पोर्ट्स पालकमंत्री चषकाचा मानकरी
वार्ताहर / दिघंची
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिघंची येथे पालकमंत्री चषकाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, हणमंतराव देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला होता.
पालकमंत्री चषक मध्ये एकूण ३२ संघ सामील झाले होते. त्यामधील राजेवाडी येथील गणेश स्पोर्ट्स आणि साळशिंग मळा येथील रोहित देशमुख स्पोर्ट्स यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये रोहित सपोर्टने बाजी मारत पालकमंत्री चषक पटकवला. यावेळी युट्यूब चॅनेलद्वारे प्रत्येक सामन्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
पालकमंत्री चषकाचे बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी महाराष्ट्र राज्याध्यक्ष अजिंक्यराणा पाटील व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष भरत देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी युवा नेते रोहित देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्री चषकाचे नेटके नियोजन केल्याचे कौतुक मान्यवरांनी केले.








