प्रतिनिधी / मडगाव
काल पासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विरोधी लस देण्यास प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी अनेकांनी कोरोना विरोधी लसचा पहिला डोस घेतला. यात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच त्यांच्या पत्नी सौ. आशा कामत यांनी ही कोरोना विरोधी लसचा पहिला डोस घेतला.
संपूर्ण जग गेले वर्ष भर कोरोना महामारीचा सामना करत आहे. यातून सुटका व्हावी यासाठी संशोधन करून तयार करण्यात आलेल्या कोरोना विरोधी लसीकरणाचा लाभ सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले आहे. मडगावच्या अर्बन हेल्थ सेंटरमध्ये जाऊन सौ व श्री. कामत यांनी लसीचा पहिला डोस घेतला.
कोरोना विरोधी लस घेतली तर मास्क वापरणे बंद करू नका, सामाजिक अंतर ठेवा असे आवाहन देखील श्री. कामत यांनी केले आहे.









