31 मार्चपर्यंत घरपट्टी भरण्याचे आवाहन,
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करा असा संदेश देत घंटागाडी सर्वत्र कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. आता मात्र कचरा गोळा करत घटपट्टी भरा, थकबाकी भरा, पाणी बिलाचा भरणा करण्याचे आवाहन घंटागाडी देत आहे. या संदेशाकडे सातारकर नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
मार्च एन्ड म्हणजे आर्थिक वर्षातील शेवटच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. कार्यालयात पाणी बिल, तसेच घरपट्टी भरण्यासाठी रांगा लागत आहेत. दोन तास रांगेत उभे राहून बिलाचा भरणा करण्यात येत आहे. तरीही काही ग्राहकांनी थकबाकी भरलेली नाही. यामुळे शाहूपुरी ग्रामपंचायतीने थकबाकीचा भार कमी करण्यासाठी लोकांना घंटागाडीच्या माध्यमातून आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. घंटागाडी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम पाळा असा संदेश देत होती. आता घरपट्टी भरा, पाणी बिलाचा भरणा करा, असा संदेश देत कचरा गोळा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. तसेच भरणा करणे आपली जबाबदारी असल्याची जाणीवही त्यांना होत आहे.







