दयानंद मांगले यांचे प्रतिपादनः देवगड आगारात मराठी भाषा दिन
वार्ताहर / देवगड:
मराठी भाषा ही साधी नसून सशक्त आहे. मराठी भाषा समजायला सोपी, ऐकायला गोड, बोलायला अवघड आहे. मराठी भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला. स्वराज्याचा मंत्र दिला. ही ज्ञानभाषा आपल्या व्यापाराची, नियमित व्यवहाराची भाषा बनावी म्हणून ताकदीने उभे रहा, असे प्रतिपादन विशेष कार्यकारी अधिकारी तथा पत्रकार दयानंद मांगले यांनी देवगड आगारात बोलताना केले.
कविश्रे÷ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिन’ म्हणून देवगड आगारात साजरा करण्यात आला. कविश्रे÷ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मांगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानकप्रमुख लवू सरवदे, वाहतूक नियंत्रक लक्ष्मण खरात, तुकाराम देवरुखकर, वरि÷ सहाय्यक कुंदा गोलतकर, कनि÷ सहाय्यक योगेश पांचाळ, चैत्राली मांजरे, मुख्य यांत्रिकी धाकू तांबे, लेखाकार श्रीकांत शेळके, रोखपाल चेतन वळंजू, भांडारपाल किशोर घाडी आदी उपस्थित होते. मांगले म्हणाले, देशातील आठ भारतरत्न या मराठी भूमीतील व मराठी भाषिक आहेत, याचाही आपणाला अभिमान असावा. मराठी भाषेचा वापर सर्वत्र मोठय़ा प्रमाणात करावा. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन कुंदा गोलतकर यांनी केले. प्रास्तविक लवू सरवदे यांनी केले. आभार श्रीकांत शेळके यांनी मानले.









