ऑनलाईन टीम / मुंबई :
आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणे नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जात आहे असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. अशाच एका प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सुद्धा अडकले होते. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्याप्रमाणेच आता करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी देखील यापूर्वी केली होती.