संसारोपयोगी साहित्य, दागिने, रोकड़ जळाली
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील वाघमोडेनगर परिसरात राहणाऱ्या संदीप शंकर आजेटराव यांच्या घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने घराला आग लागली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
या घटनेत कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. आग विझवीताना एकजण किरकोळ जखमी झाला आहे. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य, दागिने व रोखड़ जळून खाक झाल्याने अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची शक्यता घरमालकांनी व्यक्त केली आहे. घरमालक संदीप आजेटराव यांनी कुपवाड पोलिसांत फ़िर्याद दिली आहे.








