सुधाकर काशिद / कोल्हापूर
`दुकानावरील पाट्या फलक मराठीतच हव्यात’ हा काही मनसेचा इशारा नाही. दुकानावरील पाट्या इतर भाषेबरोबरच त्याच आकारात मराठीतही हव्यात हा राज्य शासनाचा कायदाच आहे. पण मराठीतल्या पाट्या दुर्मिळ आणि इंग्रजीतील पाटÎांनी मात्र दुकाने झळकून गेली आहेत. या झगमगाटात मराठी भाषेतील पाटÎाबाबतचा कायदा मात्र झाकोळून गेला आहे. उद्या मराठी राज्यभाषा दिन आहे. मराठीचा वापर सार्वजनिक सरकारी कामात ठळक व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण चक्क मराठीतल्या पाट्या बाबतचा कायदाच इंग्रजी पाटÎाच्या आड दडला गेला आहे.
उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या (गुमास्ता) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना बाबतचा पस्तिसाव्या क्रमांकाचा कायदा खास मराठी पाटÎांसाठी आहे. कारण अलीकडे आकर्षक अशी विविध उत्पादनाची शोरूम तयार होत आहेत. व्यापार-उद्योग वाढीच्या दृष्टीने ते योग्यही आहे. या शोरूमची आकर्षक सजावट हा अपरिहार्य भाग आहे. त्यामुळे एकापेक्षा एक आकर्षक शोरूम उभी राहू लागली आहेत. शोरूमचा या आकर्षणात त्याच्या नामफलकाचे नक्कीच एक वेगळेपण आहे .लांबूनही सहज नजर खेचून घेणारे हे नाम फलक आहेत. त्याची रंगसंगती त्याची प्रकाशयोजना त्यावरील लोगो हादेखील एक वेगळा व्यवसाय स्थापित झाला आहे.
कायद्यानुसार दुकानावर फक्त मराठीत फलक लावला पाहिजे अशीही अट नाही. इंग्रजी फलक असेल तर तेवढÎाच आकाराचा नामफलक मराठीतही असला पाहिजे असा हा कायदा आहे. पण त्याचाच बहुतेकांना विसर पडला आहे. किंवा या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हाच या क्षणी चा प्रश्न आहे. कारण बहुसंख्य आधुनिक शोरूमचे फलक इंग्रजीतच आहेत. या शोरूमच्या संबंधितांना विचारण्यास गेले तर नामफलक मराठीत असलाच पाहिजे असा कायदा आहे हेच आपल्याला माहित नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे व्यावसायिकांना त्यांची माहिती त्याची माहिती दुकानाला परवाना देतानाच समजावून सांगण्याची गरज आहे.
मराठी भाषा जपताना ती, दैनंदिन व्यवहारात शासकीय कारभारात सातत्याने वापरली पाहिजे. दैनंदिन व्यवहारात दुकानांवरील पाट्या खूप प्रभावी अशी भूमिका बजावतात. पर्यटन पर्यटन तर या पाटÎा वाचूनच आपली खरेदीचे तंत्र ठरवतात. त्यामुळे प्रत्येक पाटी मराठीतच असली पाहिजे असे नव्हे तर, इंग्रजी पाटी असेल तर त्यासोबत एवढÎाच आकाराची मराठी पाटी असलीच पाहिजे हा स्पष्ट कायदा आहे.
कायद्याच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी पूर्वी शॉप इन्स्पेक्टर हे पद होते. पण हे पदच रद्द झाले आहे. त्यामुळे नामफलकाची तपासणी होत नाही. आणि अशी कारवाई होत नसल्यामुळे असा काही कायदा आहे हे व्यावसायिकांनाही कळत नाही.
त्या त्या प्रांताच्या भाषेतील नामफलक इंग्रजी नामफलकासोबत उभारण्याची खबरदारी केवळ भारतीय रेल्वेने घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकावर त्या त्या स्थानकाचे नांव लिहिलेले असते. प्रवाशांना सहजपणे स्थानकाची माहिती कळू शकते. हाच उद्देश स्थानिक भाषेत पाट्या लिहण्याच्या कायद्यामागे आहे.









