वृत्तसंस्था / रॉटरडॅम
पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया एटीपी टूरवरील रॉटरडॅम खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून स्पेनचा द्वितीय मानांकित टेनिसपटू राफेल नदालने पाठदुखापतीमुळे माघार घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नदालला पाठदुखीची समस्या सातत्याने जाणवत आहे. त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत. 2009 पासून रॉटरडॅम स्पर्धेत नदालने आपला सहभाग दर्शविलेला नाही. आता स्पर्धा आयोजकांनी नदालच्या जागी रशियाच्या मेदवेदेव्हला संधी दिली आहे. सदर स्पर्धा 1 ते 7 मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे. नदालला ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत ग्रीकच्या सिटसिपेसकडून हार पत्करावी लागली होती.









