वार्ताहर / मौजेदापोली
दापोलीत सोमवारी नगरपंचायत, महसूलविभाग,पोलीस अशी संयुक्तरित्या मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई पुन्हा थंडावली असल्यामुळे नागरीक विनामास्क फिरत असल्याचे चित्र सध्या दापोलीत आहे.
दापोली दानपं, महसूल विभाग, पोलीस यांच्याकडून संयुक्तरित्या एकच दिवशीस बस स्थानक परिसरात धडाकेबाज कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू आहे. हे लक्षात व समजताच शहरात फिरणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लागले. मात्र ही कारवाई मंगळवारपासून थंडावल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दापोलीत आहे.









