मिरज सुधार समितीचा मनपा, जि.प.शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव
प्रतिनिधी / मिरज
सध्या सर्वत्र ऑनलाईन परिक्षांचे सत्र सुरू आहे. ऑनलाईनद्वारे दिलेल्या परिक्षांची उत्तरपत्रिका शाळांमध्ये सादर करताना फी भरल्याशिवाय उत्तरपत्रिका जमा न करण्याची ताठर भुमिका शिक्षण संस्थांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांची होणारी परवड तसेच शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना मिळणारी अपमानास्पद वाणगूक आणि आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी मिरज शहर सुधार समितीने केली आहे.
समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालत संबधित शाळा व्यवस्थापनांवर कारवाईची मागणी केली. यावेळी शहरातील काही शाळांचे पालक सुध्दा उपस्थित होते.








