कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सरपंच निवडी 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहेत. या सहा तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, भुदरगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यांचा समावेश आहे. या सरपंच निवडी 25 फेब्रुवारी रोजी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी संबंधित तहसिलदारांना दिले आहेत. हरकतींवर सुनवणीनंतर सरपंच निवडीचा मार्ग खुला झाला आहे.









