बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना उपायुक्तांना स्वेच्छेने बीपीएल कार्ड परत न देणाऱ्या श्रीमंत लोकांवर कारवाई करण्यास अधिकार देण्यात आला असल्याचे सांगितले.
मंगळवारी शिवमोग्याजवळील सोगणे येथे सुरू असलेल्या विमानतळ प्रकल्प कामाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अपात्र लोकांना लवकरात लवकर कार्डे परत करण्यास सांगितले असल्याचे म्हंटले.
दरम्यान आरक्षणाच्या लाभासाठी विविध समुदायांनी केलेल्या मागण्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकार कायदेशीर चौकटीत या संदर्भात योग्य ती पावले उचलेल. मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होईल. सरकार या विषयावर सावधगिरीने बोलेल असंही ते म्हणाले.
मंत्री आपापल्या समाजाच्या आरक्षणाच्या लाभासाठी मंत्री लढा देत आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेत्यांनी केली असता, मुख्यमंत्री यांनी सरकारवर टीका करणे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत असल्याचेही ते म्हणाले.
शिवमोगा विमानतळ प्रकल्पाचे काम एका वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एअरबस ए ३२० सारख्या विमानांना विमानतळावर ऑपरेट करता यावे यासाठी स्पेसिफिकेशनसाठी ३८४ कोटी रुपये खर्चून हे विकसित केले जात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.