प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत झालेल्या ग्रामपंचायतींसाठी दि.15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी व तद्नंतर निकाल घोषीत झालेला आहे. निकाल घोषीत झाल्यापासून 30 दिवसांच्या आत म्हणजे 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य, उमेदवार यांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार कार्यालयात 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावा.
राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपंस/2010/प्र.क्र.9/का.7 दि.3011.2010 अन्वये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आवश्यक केलेल्या रितीने सादर न केल्यास अशा उमेदवारास सदस्य म्हणून राहण्यास असा सदस्य होण्यासाठी निरर्ह ठरविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्राप्त आहेत. तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर करावा.