ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 11 हजार 649 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 90 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 09 लाख 16 हजार 589 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 55 हजार 732 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 82 लाख 85 हजार 295 लोकांना लस देण्यात आली आहे.
रविवारी 09,489 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 21 हजार 220 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 39 हजार 637 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 20 कोटी 67 लाख 16 हजार 634 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 04 लाख 86 हजार 222 कोरोना चाचण्या रविवारी (दि.14) करण्यात आल्या.









