वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2020 मध्ये जगभरातील लोकांनी सब्सक्रिप्शन ऍप्सवर जोरदार खर्च केला आहे. यांचा काही प्रमाणात अंदाज लावल्यास टॉपच्या 100 नॉन-गेम सब्सक्रिप्शन ऍप्सने मागील वर्षामध्ये जवळपास 94,627 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. सदरची वाढ ही वार्षिक पातळीवर पाहिल्यास जवळपास 34 टक्क्यांनी वाढल्याची नोंद केली आहे. वर्ष 2019 मध्ये याच ऍप्सची एकूण कमाई जवळपास 70,606 कोटी रुपयांवर राहिली होती, अशी माहिती सेंसर टॉवरच्या अहवालातून दिली आहे. ऍप विश्लेषक फर्म सेंसर टॉवर यांच्या आकडेवारीनुसार टॉपच्या 100 नॉन सब्सक्रिप्शन ऍपचा महसूल, ग्राहकांकडून मागील वर्षी या ऍप खरेदीवर खर्च जवळपास 8,07,939 कोटी रुपये जवळपास 11.7 टक्के होता.
सर्वाधिक कमाईमधील ऍप
पहिल्या दहा ऍपमध्ये युटय़ूब, डिझ्नी प्लस, टिंडर, पँडोरा, गुगल वन, ट्विच, बंबल, एचबीओ मॅक्स, हुलु आणि ईएसपीएनचा समावेश राहिला आहे.
युटय़ूबची कमाई सर्वोच्च

ऍपमध्ये यूटय़ूब हे ऍप सर्वोच्च पातळीवर राहिले असून यांची नफा कमाई सर्वाधिक राहिली आहे. जगभरातील कंपन्यांची एकूण कमाई 7,218 कोटी रुपये होती. तर एकटय़ा अमेरिकेमध्ये युटय़ूबने जवळपास 4,090 कोटी रुपयांची कमाई केली आहे.









