बेंगळूर/प्रतिनिधी
मार्चच्या पहिल्या आठवड्यात २०२१-२२ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी सांगितले.
माजी मुख्यमंत्री केंगळ हनुमंतैय्या यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुख्यमंत्री विधान सौध येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल अशी माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे सांगितले असले तरी अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. लवकरच तारीख निश्चित केली जाईल असे ते म्हणाले. प्री-बजेट बैठका एका आठवड्याच्या आत पूर्ण होतील.बुधवारी येडियुरप्पा यांनी विविध विभागांसमवेत प्री-बजेट बैठकीची मालिका घेतली.
कर्नाटकातील विविध समुदायांकडून वाढत्या आरक्षणाच्या मागण्यांबद्दल, येडियुरप्पा यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण घटनात्मक चौकटीत सर्व परवानगी देणार असल्याचे म्हंटले. मी या विषयावर कायदेशीर तज्ञांचा सल्ला घेईन. कायदा आम्हाला ज्याची परवानगी देतो आम्ही अंमलबजावणी करू, असे त्यांनी आश्वासन दिले.