प्रतिनिधी/ सातारा
तरडगांव, (ता.फलटण) गावच्या हद्दीत एसटी बस भरधाव वेगाने चालवून सायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक विकास नंदकुमार आर्ते (रा. शिरवली, ता. खानापूर) याच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास तरडगाव, ता. फलटण गावच्या हद्दीत कॅफे पेट्रोलपंपासमोर एसटी बस (क्रमांक एमएच 06 एएस-9527) वरील चालक विकास नंदकुमार आर्ते याने एसटी बस भरधाव वेगात चालवून रामसिंग काळूराम गुरखा (वय 60, रा. तरडगाव, ता. फलटण) हे सायकलवरुन जात असताना सायकलला धडक दिली.
या अपघातात रामसिंग गुरखा गंभीर जखमी झाले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याने याबाबत त्यांचा मुलगा गणेश रामसिंग गुरखा यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर एसटी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार तडवी या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.







