सेन्सेक्स-निफ्टीमध्ये हलकीशी घसरण- नफा कमाईचा बाजारावर प्रभाव
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअर बाजाराने मागील सहा सत्रांमध्ये प्राप्त केलेल्या तेजीला अखेर चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी घसरण झाली आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्हीमध्ये हलकीशी घसरण नोंदवली आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये माहिती तंत्रज्ञान, दैनदिन वापारातील साहित्य बनविणाऱया कंपन्या आणि वाहन कंपन्याचे समभागांमध्ये नफा कमाई झाल्याने ही घसरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील सेन्सेक्स काही काळ 487 अंकांनी मजबूत होत 51,835.86 अंकांचा उचांक प्राप्त केला होता. परंतु काही वेळानंतर तेजीचा माहोल कमी होत गेल्याने दिवसअखेर सेन्सेक्स 19.69 अंकांनी प्रभावीत निर्देशांक 5।329.08 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6.50 अंकांनी घसरुन निर्देशांक 15,109.30 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
ट्रेडिंग दरम्यान निफ्टीने 15,257.10 अंकांचा विक्रम नेंदवला होता, परंतु नफा कमाईच्या वातावरणामुळे निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे. यातील सेन्सेक्समधील महिंद्रा ऍण्ड महिंद्रा चार टक्क्यांनी सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, आयटीसी, सन फार्मा, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह आणि टीसीएस यांचा समावेश आहे. दुसऱया बाजूला मात्र एशियन पेन्ट्स, ओएनजीसी, टायटन, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि ऍक्सिस बँक हे तेजीत राहिले होते.
देशातील बाजारातील व्यवहारानंतर प्रथम चढउताराचे वातावरण राहिले होते यामुळे नफा कमाई झाली आहे. निवडक कंपन्यांचे समभाग तेजीचे समर्थन मिळाले होते. यामध्ये मध्यम आणि लहान कंपन्यांचे समभागांमध्ये कमजोर वातारवणामुळे आर्थिक कंपन्यांसोडून अन्य कंपन्या नुकसानीत राहिल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
आगामी काळात तिमाही कंपन्यांचे सकारात्मक अहवालाचे परिणामांचा गुंतवणूकदार विचार करुन ते आपला गुंतवणूक करण्याचा कल निश्चित करणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. याचा प्रभाव देशातील शेअर बाजारावर मजबूत राहणार असल्याचेही वातारण आहे. यामुळे आगामी वाटचाल पाहावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आशियातील शांघाय कम्पोजिट, हाँगकाँकचा हँगसेंग आणि जपानचा निक्की लाभात राहिले आहेत. दक्षिण कोरायचा कोस्पी नुकसानीत राहिला आहे. युरोपमधील प्रमुख बाजार मात्र घसरणीत राहिला आहे. याचदरम्यान जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.40 टक्क्यांनी वाढून 60.94 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे.








