बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते राज्याचा अर्थसंकल्प 2021-22 सादर करणार आहेत.
मंगळवारी हरिहर तालुक्यातील राजनहळ्ळी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी अर्थसंकल्प तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहेत. आयटी (माहिती तंत्रज्ञान) आणि बीटी (बायोटेक्नॉलॉजी) यासह सर्व क्षेत्रातील संसाधने एकत्र करण्यासाठी ते प्रयत्न करतील, असे ते म्हणाले.
कोविड -१९ साथीच्या आजारामुळे राज्यातील महसुलाला चांगलाच फटका बसला असून गेल्या तीन महिन्यांत त्यात सुधारणा होत आहे. कर्नाटकची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार आहे. ते महर्षी वाल्मिकी गुरुपीठाने आयोजित वाल्मिकी जत्रेत उपस्थित होते. दरम्यान समाजाने आरक्षण वाढवून ७.५ टक्के करण्याची मागणी या समुदायाने सरकारकडे केली आहे.