जेसीबीने केला परिसर स्वच्छ : नागरिकांकडून मोहिमेचे स्वागत
प्रतिनिधी / बेळगाव
शास्त्रीनगर व न्यू गुड्सशेड रोडजवळील ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल शेजारून वाहणाऱया लेंडी नाल्यात गेल्या 2 ते 3 वर्षात पावसाळय़ात वाहून आलेली माती, गाळ तसेच त्यावर पोसलेली झाडी आणि नाल्याशेजारच्या लोकांनी नाल्यात वेळोवेळी टाकलेला कचरा अशा विविध प्रकारांमुळे या परिसरात डासांची भरपूर प्रमाणात उत्पत्ती होऊन आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले होते.
या बाबतीत राहुल पाटील यांनी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ व पर्यावरण विभागाचे अधिकारी आदिल खान यांच्या नजरेस हा प्रकार आणून दिला व पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी आपल्या विभागाच्या पथकासह परिसराला भेट देऊन जेसीबीच्या साहाय्याने ताबडतोब नाल्यातील गाळ काढण्याची सूचना केली.
या कामी आरोग्य विभागाचे प्रभाग निरीक्षक शिवानंद भोसले, मुकादम ईसय्या, विजय जाधव, जेसीबी चालक अकबर काझी, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा खटावकर व राजू पाटील या सर्वांचे सहकार्य
लाभले.
याप्रसंगी रमेश चिकोर्डे, उज्ज्वला आंबेवाडीकर, गोपाळ मलवदे, शरद खांडे व पटेल, जैन, जुवेकर परिवार उपस्थित होते. महानगरपालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना करण्यात आली.









