प्रतिनिधी / सांगली
भोई समाज हा मासेमारीचा रोजगार व्यवसाय करुन पुढे आलेला आहे. त्यांनी २०१९ च्या पुरात अडकलेल्या नागरिकांची होड्या कायलीमधून ने-आण करुन सुटका केली आहे. मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कायलींचा उपयोग माणसांचा जीव वाचविण्यासाठीही होऊ शकतो, हे भोई समाजाने ओळखाले आहे. त्यामुळेच आपणास अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे, असे गौरवोद्गार कृषी राज्य मंत्री हॉ. विश्वजीत कदम यांनी काढले. हरिपूर-सांगली ग्रुप व भोईराज मच्छीमारी सहकारी सोसायटी तर्फे रोटरी हॉल येथे आयोजित कार्यक्रमात कायली वितरणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील, युवा नेते विशाल पाटील आदी उपस्थित होत. डॉ. कदम म्हणाले, जिल्ह्यात सन २०१९ मध्ये आलेल्या कृष्णा नदीच्या महापुरात भोई समाज धैर्याने सामोरे गेलेला आहे. या बांधवांनी केलेल्या पाठपुराव्यास सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नाने शासनाकडून नुकतेच अनुदान मिळाले आहे.
त्या अनुदानाचा सुयोग्य विनियोग करून संस्थेच्या सभासदांना कायली वितरण करण्याचा निर्णय भोई समाजाने घेतला हे कौतुकास्पद आहे. समाजाच्या हितासाठी गरीब व होतकरूसाठी जी मदत लागेल ती आम्ही करू, असे आश्वासन डॉ. कदम यांनी दिले. वित्तविभाग सहसंचालक वैभव राजे घाटगे म्हणाले, भोई समाज मासेमारी करून उदर निर्वाह करून जगत आहे. तसेच त्यांना महापुरात आलेल्या अडचणींची जाणीव आहे.
मत्स्य विकास प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे म्हणाले, भोई समाज मासेमारी करून जगताना त्यांना या कायलीचा उपयोग होईल. सध्या नदीत मगरीचा वावर आहे. त्यामुळे मगरींपासून संरक्षणासाटी कायली महत्वाची आहेत. कार्यक्रमामध्ये निवृत् मत्स्य अधिकारी राजगुरू नाडगोडा, विशाल दाद यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हाभरातून भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.








