गोडोली/ प्रतिनिधी :
औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने सातारा एसटी बस स्थानक येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगर असा फलक लावला, त्यानंतरच ही एसटी रवाना झाल्याचे शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी सांगितले.
पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानंतर पक्ष नेते बाळा नांदगावकरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात औरंगाबादच्या नामकरणासाठी जनांदोलन छेडले आहे. सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, ॲड. विकास पवार, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, सातारा शहर अध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शनिवारी सातारा एसटी बस स्थानक येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसवर छत्रपती संभाजीनगरचा फलक लावला.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर हे नामांकरण करू शकत नाहीत.मनसेने हा मुद्दा आक्रमक पणे हाती घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण होणारचं,’ असे जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे यांनी सांगितले.
यावेळी मनसे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र बावळेकर सागर बर्गे, कोरेगाव तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे, जावली तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, वाई तालुका अध्यक्षसमीर गोळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कासुरडे, पाचगणी शहर अध्यक्ष निखिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.









